राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ‘या’ रिक्त पदांसाठी भरती सुरू
६० हजार रुपयांपर्यंत मिळणार वेतन
राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे, म्हणजेच नॅशनल हेल्थ मिशन ठाणे (NHM) अंतर्गत विविध पदांच्या ६२ रिक्त जागांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तसेच अर्जाची अंतिम तारीख २९ फेब्रुवारी असणार आहे. या भरतीसाठी पदे, वेतन, अर्ज प्रक्रिया याची सविस्तर माहिती जाणून घेऊ.
पदाचे नाव
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, कार्यक्रम सहाय्यक, योग प्रशिक्षक, कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्यतज्ज्ञ, लॅब तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, मनोरुग्ण सामाजिक कार्यकर्ता, ऑडिओलॉजिस्ट, मानसोपचार परिचारिका, फार्मासिस्ट, वैद्यकीय अधिकारी AYUSH .
पदसंख्या – ६२ जागा
वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे, तर मागासवर्गीयांकरिता ४३ वर्षे वयोमर्यादा आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, ४ था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद, ठाणे.
पगार
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक- ३५ हजार रुपये.
कार्यक्रम सहाय्यक – १८ हजार रुपये.
कीटकशास्त्रज्ञ – ४० हजार रुपये.
सार्वजनिक आरोग्यतज्ज्ञ – ३५ हजार रुपये.
लॅब तंत्रज्ञ – १७ हजार रुपये.
वैद्यकीय अधिकारी :- एमबीबीएस उमेदवारांकरीता- ६० हजार रुपये, तर बीएएमएस उमेदवारांकरीता २५ हजार रुपये पगार असेल आणि १५ हजार रुपये कामावर आधारित मोबदला दिला जाईल.
मनोरुग्ण सामाजिक कार्यकर्ता – २८ हजार रुपये.
ऑडिओलॉजिस्ट- २५ हजार रुपये.
मानसोपचार परिचारिका – २५ हजार रुपये.
फार्मासिस्ट – १७ हजार रुपये.
वैद्यकीय अधिकारी AYUSH – ३० हजार रुपये असणार आहे.
NHM Thane Bharti २०२४: पदे आणि पदसंख्या
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक – ०१
कार्यक्रम सहाय्यक- ०१
योग प्रशिक्षक- ०१
कीटकशास्त्रज्ञ – ०५
सार्वजनिक आरोग्यतज्ज्ञ – ०५
लॅब तंत्रज्ञ – १०
वैद्यकीय अधिकारी – ३०
मनोरुग्ण सामाजिक कार्यकर्ता – ०१
ऑडिओलॉजिस्ट – ०१
मानसोपचार परिचारिका – ०१
फार्मासिस्ट – ०५
वैद्यकीय अधिकारी AYUSH – ०१
NHM Thane Bharti २०२४: अर्जाबरोबर कोणती कागदपत्रे जोडाल ?
वयाचा पुरावा.
पदवी/पदविका प्रमाणपत्र (सर्व वर्षांचे प्रमाणपत्र).
गुणपत्रिका.
कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (शक्य असल्यास) .
शासकीय/निमशासकीय संस्थांमध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र.
जात / वैधता प्रमाणपत्र आदी.
शैक्षणिक पात्रता
प्रत्येक उमेदवारांच्या पदानुसार त्याची शैक्षणिक पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.
लिंक : https://drive.google.com/file/d/1zNEMiJtz2CcaKKfA_Wuec8NURTMiUoKc/view
