Wednesday, January 14, 2026
Homeचालू घडामोडी ‘होम गार्ड’ पदासाठी मेगाभरती सुरू

 ‘होम गार्ड’ पदासाठी मेगाभरती सुरू

 ‘होम गार्ड’ पदासाठी मेगाभरती सुरू

१२ वी उत्तीर्ण झालेल्या आणि सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. कारण ‘होम गार्ड’ पदासाठी मेगाभरती सुरू झाली आहे. या पदासाठी एकूण १०,२८५ जागा उपल्बध आहेत. तसेच इच्छुक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ फेब्रुवारी २०२४ असणार आहे.

 पदाचे नाव आणि पदसंख्या – होम गार्डसाठी १०,२८५ पदे.

 शैक्षणिक पात्रता

होमगार्ड भरतीसाठी उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा. पण, माजी सैनिक आणि माजी CAPF कर्मचाऱ्यांसाठी शैक्षणिक पात्रता फक्त १० वी उत्तीर्ण आहे.

वयोमर्यादा – २० ते ४५ वर्षे

अर्ज शुल्क – १०० रुपये

 अधिकृत वेबसाईट – https://dghgenrollment.in/

 महत्त्वाची कागदपत्रे

वैध पासपोर्ट.
निवडणूक आयोगाचे फोटो किंवा कार्ड.
नाव आणि छायाचित्रे असणारी शिधापत्रिका. शिधापत्रिका नसल्यास उमेदवाराचा फोटो दुसऱ्या ओळखीच्या पुराव्याबरोबर देणे आवश्यक आहे.
वाहतूक विभाग GNCT दिल्लीद्वारे जारी केलेला वैध ड्रायव्हिंग परवाना.
सार्वजनिक क्षेत्रातील बँक खात्याचे रहिवासी असलेले छायाचित्र प्रमाणित पासबूक.
महसूल विभागाच्या अधिकृत सरकारी प्राधिकरणाने जारी केलेले प्रमाणपत्र.

 अर्ज कसा करावा

या भरतीसाठी फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. उमेदवारांनी सगळ्यात आधी महत्त्वाची कागदपत्रे कोणती लागणार आहेत हे पाहून घ्यावी आणि १३ फेब्रुवारीच्या आधीच इच्छुक उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments