सेंट्रल बँकेत बंपर भरती!
१० वी पास उमेदवार करू शकतात अर्ज
जर तुम्ही १०वी उत्तीर्ण आहात आणि तुम्हाला बँकेत नोकरी करायची असेल तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) मध्ये चांगली संधी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे सब स्टाफ अर्थात सफाई कर्मचारी या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारा कोणताही उमेदवार Centralbankofindia.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतो. यासाठी अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी आजपासून अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या या पदांसाठी तुम्ही ९ जानेवारी २०२४ किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकता. या विशेष भरतीअंतर्गत, स्वच्छता कर्मचारी म्हणून उपकर्मचाऱ्यांच्या एकूण ४८४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. तुम्हालाही या पदासाठी अर्ज करून नोकरी मिळवायची असेल, तर खाली दिलेल्या या गोष्टी काळजीपूर्वक वाचा.
सेंट्रल बँकेत अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे ही पात्रता असली पाहिजे
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून दहावी किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. याशिवाय स्थानिक भाषेचेही ज्ञान असले पाहिजे.
सेंट्रल बँकेत अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा किती असेल?
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा ३१ मार्च २०२३ रोजी १८ ते २६ वर्षे दरम्यान असावी. याशिवाय सरकारी नियमांनुसार वयातही सवलत दिली जाणार आहे.
फॉर्मसाठी अर्जाची फी भरावी लागेल
अर्जाची फी उमेदवारांच्या श्रेणीनुसार बदलते. SC/ST/PWBD/महिला उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून १७५ रुपये (जीएसटीसह) भरावे लागतील तर इतर सर्व उमेदवारांना ८५० रुपये (जीएसटीसह) भरावे लागतील.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती २०२३ साठी अर्ज करण्यासाठी लिंक – https://www.centralbankofindia.co.in/en
