Wednesday, January 14, 2026
Homeचालू घडामोडीMBBS उमेदवारांना पुण्यात नोकरीची मोठी संधी! 

MBBS उमेदवारांना पुण्यात नोकरीची मोठी संधी! 

MBBS उमेदवारांना पुण्यात नोकरीची मोठी संधी! 

वैद्यकीय क्षेत्रातील उमेदवारांना पुण्यात नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पुणे येथे ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण १५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करता येणार आहेत.

कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पुणे भरती २०२३ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२३ ही आहे. ही भरती मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनासाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. तर या मुलाखतीची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती २०२३

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी

एकूण पदसंख्या – १५

शैक्षणिक पात्रता – MBBS. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात अवश्य वाचा.

नोकरीचे ठिकाण – पुणे

वयोमर्यादा – ६९ वर्षे

अर्जाची पद्धत – भरतीसाठी ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

ई-मेल पत्ता – establishpune.amo@gmail.com

महत्वाच्या तारखा –

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ डिसेंबर २०२३

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे

मुलाखतीची तारीख – ५ जानेवारी २०२४

मुलाखतीचा पत्ता – प्रशासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचे कार्यालय, तळमजला, पंचदीप भवन, क्र. ६८९/९०, बिबवेवाडी, पुणे-४११०३७

अधिकृत वेबसाईट –  https://www.esic.gov.in/

असा करा अर्ज –

  • भरतीसाठी ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करा.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर पाठवा.
  • अर्जामध्ये माहिती संपूर्ण माहिती भरा.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज ३१ डिसेंबर २०२३ पूर्वी करा.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments