मुख्यमंत्री आणि केंद्रीय संरक्षण मंत्री यांच्या हस्ते द सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्ड २०२३ चे वितरण
कॉर्पोरेट क्षेत्राने स्वयंप्रेरणेने देशाच्या उन्नतीसाठी योगदान द्यावे – केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
मुंबई / सामाजिक जबाबदारी कायदेशीररित्या बंधनकारक असलेल्या कोणत्याही कर भरण्यापेक्षा वेगळी आहे. जेव्हा आपण कोणताही कर भरतो तेव्हा समाज आपल्याशी जोडला जात नाही.देशाच्या,समाजाच्या कल्याणासाठी मदत करतो तेव्हा अनेक व्यक्ती, समाज आपल्याशी जोडला जातो. त्यामुळे कॉर्पोरेट क्षेत्राने स्वयंप्रेरणेने देशाच्या उन्नतीसाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले.बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज येथे द सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्डस् वितरण सोहळा संपन्न झाला.यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, द सीएसआर जर्नल एक्सलन्सचे अमित उपाध्याय, प्रसिद्ध कवी कुमार विश्वास,माजी केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, समाज,देश आणि राष्ट्राला प्राधान्य देत देशात मोठ्याप्रमाणात सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्था आणि कंपन्या आहेत. शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण, महिला सक्षमीकरण आणि बाल कल्याण, पर्यावरण, कृषी, ग्रामीण विकास,आरोग्य आणि स्वच्छता या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान आज करण्यात येत आहे.सांस्कृतीकार्य मंत्री मुनगंटीवार यांनी वने, आणि मत्स्यव्यवसाय या क्षेत्रात विविध योजना राबवून अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. लंडन येथील छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे परत आणण्याचा सामंजस्य करार केला. हजारो झाडांची लागवड करून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा निर्णय घेतला त्यांना आज गुड गव्हर्नन्स या पुरस्कारानी सन्मानित करण्यात येत आहे. त्याबद्दल अभिनंदन करून खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यांना एंबेसडर फॉर सोशल इम्पॅक्ट हा पुरस्कार प्राप्त झाला त्याबद्दल मला वडील म्हणून अभिमान आहे. असे सांगून दुर्गम भागात आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी सामजिक कार्य करणारे पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
