पदवीधरांना पुण्यात नोकरीची मोठी संधी!
पुण्यात नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, पुणे अंतर्गत ‘क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ डिसेंबर २०२३ आहे. पुणे महानगरपालिका भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया
पदाचे नाव – क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर.
एकूण पदसंख्या – १६
शैक्षणिक पात्रता – BSC पदवी.
- ४० श.प्र.मि. इंग्रजी आणि ४० श.प्र.मि. मराठी टायपिंग सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा पास.
नोकरीचे ठिकाण -पुणे</p>
पगार – २१,८४० रुपये महिना.
वयोमर्यादा – खुला प्रवर्ग – ३८ वर्षे.
मागासवर्गीय उमेदवारांसाठी – ४३ वर्षे.
अर्जाची पद्धत – ऑफलाईन.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळवार पेठ, पुणे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ डिसेंबर २०२३
अधिकृत वेबसाईट – https://pmc.gov.in/
महत्वाची कागदपत्र –
- जन्म तारखेचा पुरावा
- शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र.
- फोटो आयडी : आधारकार्ड / पासपोर्ट / वाहन परवाना / पॅनकार्ड इ.
- टायपिंग प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र. (आवश्यक असल्यास)
