NIV पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी (NIV) पुणे अंतर्गत ‘तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ-१’ पदांच्या एकूण ८० रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठी उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी भरती २०२३ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, वयोमर्यादा आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी भरती २०२३
पदाचे नाव – तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ-१
एकूण पदसंख्या – ८०
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात अवश्य पाहा.
नोकरीचे ठिकाण – पुणे /p>
अर्जाची पद्धत – ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट – https://niv.icmr.org.in/
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर २०२३
भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना पुढीलप्रमाणे पगार मिळणार आहे.
- तांत्रिक सहाय्यक – ३५ हजार ४०० ते १ लाख १२ हजार ४०० रुपये.
- तंत्रज्ञ-१ – १९ हजार ९०० ते ६३ हजार २०० रुपये.
