मुंबई कस्टम्स अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु
मुंबई कस्टम्स अंतर्गत कर सहाय्यक, हवालदार आणि कॅन्टीन अटेंडंट पदांच्या ३२ रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.
मुंबई कस्टम्स भरती २०२३ –
पदाचे नाव – कर सहाय्यक, हवालदार, कॅन्टीन अटेंडंट
एकूण पदसंख्या – ३२
शैक्षणिक पात्रता – कर सहाय्यक –
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष.
- कॉम्प्युटर अॅप्लिकेशन वापराचे प्राथमिक ज्ञान असावे.
- डेटा एंट्री कामासाठी प्रति तास कमीत कमी ८००० की डिप्रेशन स्पीड आवश्यक.
हवालदार/कॅन्टीन अटेंडंट –
- कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून दहावी किंवा समकक्ष.
नोकरीचे ठिकाण– मुंबई</strong>
वयोमर्यादा – कर सहाय्यक, हवालदार – १८ ते २७ वर्षे, कॅन्टीन अटेंडंट – १८ ते २५ वर्षे.
अर्जाची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक / सीमाशुल्क उपायुक्त, कार्मिक आणि आस्थापना विभाग, ८ वा मजला, नवीन कस्टम हाउस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई ४०० ००१.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर २०२३
अधिकृत वेबसाईट – https://www.mumbaicustomszone1.gov.in/
पगार –
- कर सहाय्यक – २५ हजार ५०० रुपये ते ८१ हजार १०० रुपये.
- हवालदार – १८ हजार ते ५६ हजार ९०० रुपये.
- कॅन्टीन – १८ हजार ते ५६ हजार ९०० रुपये.
