भूसंपादन मावेजासाठी निधी उपलब्ध करून देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई / जामनेर मतदारसंघातील तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत जलसंपदा प्रकल्पांकरीता अधिग्रहीत जमिनींच्या भूसंपादन मावेजासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे जामनेर मतदारसंघातील तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत जलसंपदा प्रकल्पांकरीता अधिग्रहीत केलेल्या जमिनींचे भूसंपादन संदर्भातील बैठक झाली.
यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,आमदार मंगेश चव्हाण, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी हे उपस्थित होते. पुरवणी मागण्यांद्वारे यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल असेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आवर्जून सांगितले.
