निवृत्त कर्मचाऱ्यांना चांगली संधी; परीक्षेशिवाय बँकेत नोकरी, पगारही चांगला
निवृत्तीनंतरही काम करण्याचा उत्साह असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ने रिझोल्व्हरच्या पदासाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवार SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 1 नोव्हेंबरपासून सुरू असून उमेदवार 21 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 94 रिक्त पदे भरली जातील. अधिकृत अधिसूचना पूर्णपणे वाचल्यानंतर उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. तुम्हाला फक्त ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
पात्रता निकष काय?
जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, SBI मधून निवृत्त अधिकारी देखील या पदांसाठी अर्ज करू शकतात. संबंधित क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. शैक्षणिक पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार जारी केलेले भरतीबाबतची अधिसूचना पाहावी.
परीक्षेशिवाय भरती…
या पदांवर निवडलेल्या उमेदवारांची निवड परीक्षा न करता केली जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीत 100 गुणांचे प्रश्न विचारले जातील. अंतिम निवड गुणवत्तेद्वारे केली जाईल.
