Thursday, January 15, 2026
Homeचालू घडामोडी‘स्टॅच्यू ऑफ युनिटी सायकल अभियान’ पूर्ण करणाऱ्या विद्यार्थी चमूला राज्यपालांकडून कौतुकाची थाप

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी सायकल अभियान’ पूर्ण करणाऱ्या विद्यार्थी चमूला राज्यपालांकडून कौतुकाची थाप

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी सायकल अभियान’ पूर्ण करणाऱ्या विद्यार्थी चमूला राज्यपालांकडून कौतुकाची थाप

मुंबई / मुंबई ते गुजरात येथील सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हे ४३० किमी अंतर सायकलने पूर्ण करणाऱ्या एचएसएनसी विद्यापीठाच्या विद्यार्थी चमूला राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी नुकतेच राजभवन येथे कौतुकाची थाप दिली. तेरा सदस्यांच्या या सायकल अभियानाचे यशस्वी नेतृत्व केल्याबद्दल राज्यपालांनी दिव्यांग सायकलपटू मयूर दुमसिया यांचे अभिनंदन केले. यावेळी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. हेमलता बागला, के. सी. महाविद्यालयाच्या प्राचार्य तेजश्री शानभाग आणि सायकल अभियानात सहभागी विद्यार्थी उपस्थित होते. विद्यापीठाच्या ‘फिट भारत क्लब’ तर्फे ही मोहीम राबविण्यात आली असून ही मोहीम दरवर्षी राबविली जाईल, असे डॉ. बागला यांनी यावेळी सांगितले. या यशस्वी मोहिमेनंतर विद्यापीठातर्फे काश्मीर ते कन्याकुमारी हे सायकल अभियान राबविले जाईल असे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments