कर्मचारी राज्य विमा महामंडळद्वारे निघाली २७५ जागांवर भरती, ९२ हजारपर्यंत मिळू शकतो पगार
कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) ने पॅरामेडिकल पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. पॅरामेडिकलच्या २७५ पदे भरण्यासाठी ही भरती मोहीम राबविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट http://www.esic.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. ESIC पॅरामेडिकल भरती 2023 साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० ऑक्टोबर आहे. नोकरी मिळविणाऱ्या उमेदवारांना स्तर-३, ४ आणि ५ अंतर्गत पगार मिळेल. वेतन स्तर- ५ अंतर्गत वेतनश्रेणी रुपये २९,२००- ९२३०० आहे. या पदांवर भरती केली जाणार आहे. या भरतीमध्ये ऑडिओमीटर टेक्निशियन, डेंटल मेकॅनिक, ईसीजी टेक्निशियन, ज्युनिअर रेडिओग्राफर, ज्युनिअर वैद्यकीय, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ओटी असिस्टंट, फार्मासिस्ट (अॅलोपॅथिक), फार्मासिस्ट (आयुर्वेद), फार्मासिस्ट (होमिओपॅथी), रेडिओग्राफर यासह अनेक पदांवर रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
निवड प्रक्रिया
पात्र अर्जदारांची फेज-१ आणि २ लेखी परीक्षेतील कामगिरीच्या आधारावर निवड केली जाईल. फेज-१ ची लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना फेज-२ साठी बोलावले जाईल.
ESIC भरती 2023: कसे अर्ज करावे?
सर्वात आधी ESIC अधिकृत वेबसाइट http://www.esic.gov.in वर दिलेल्या रिक्रूटमेंट टॅबवर क्लिक करा. येथे अर्जाच्या फॉर्म लिंकवर क्लिक करा आणि आवश्यक तपशील भरा. आवश्यक कागदपत्रे जमा करून अर्जाचे शुल्क जमा करा. तुमचा फॉर्म जमा होईल. पुढे अर्जाची प्रत डाउनलोड करा आणि तुमच्या जवळ ठेवा.
