सातवी पास ते पदवीधरांना महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांच्या २१०९ जागांसाठी भरती सुरु
महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत तब्बल २ हजारांहून अधिक जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ नोव्हेंबर २०२३ आहे. महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज फी याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग भरती २०२३ –
पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, कनिष्ठ अभियंता (विद्युत), स्वच्छता निरीक्षक, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, वरिष्ठ लिपीक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, लघुलेखक ( उच्चश्रेणी), वाहन चालक, लघुलेखक (निम्नश्रेणी), क्लिनर आणि शिपाई.
एकूण रिक्त पदे – २१०९
- शैक्षणिक पात्रता – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदविका किंवा समतुल्य.
कनिष्ठ अभियंता (विद्युत) : विद्युत अभियांत्रिकी विषयातील पदविका किंवा समतुल्य
कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ : वास्तूशास्त्र विषयातील पदवी + कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर नवी दिल्ली नोंदणी.
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक : स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक १ वर्षे मुदतीचा पाठयक्रम पूर्ण किंवा समतुल्य किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका/ पदवी.
लघुलेखक (उच्चश्रेणी) : १० वी पास + लघुलेखन वेग किमान १२० श.प्र.मि. + इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. किंवा मराठी टायपिंग ३० श.प्र.मि.
लघुलेखक (निम्नश्रेणी) : १० वी पास + लघुलेखन वेग किमान १०० श.प्र.मि. + इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. किंवा मराठी टायपिंग ३० श.प्र.मि.
उद्यान पर्यवेक्षक : कृषी किंवा उद्यानविद्या विषयातील पदवी + २ वर्षे अनुभव.
सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ : वास्तूशास्त्र विषयातील पदवी.
स्वच्छता निरीक्षक : १० वी पास + स्वछता निरीक्षक प्रमाणपत्र परीक्षा परीक्षा उत्तीर्ण किंवा स्वछता अभियांत्रिकी पदविका.
वरिष्ठ लिपीक : कोणत्याही शाखेतील पदवी.
प्रयोगशाळा सहाय्यक : रसायनशास्त्र या प्रमुख विषयासह विज्ञान शाखेतील पदवी किंवा कृषी शाखेतील पदवी.
वाहन चालक : १० वी पास + हलके मोटार वाहन किंवा मध्यम प्रवासी वाहन किंवा जड प्रवासी वाहन चालक परवाना.
क्लिनर : ७ वी पास.
शिपाई : १० वी पास
वयोमर्यादा – खुला प्रवर्ग १८ ते ४० वर्षे.
- मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.
अर्ज फी – खुला प्रवर्ग – १००० रुपये.
- मागासवर्गीय – ९०० रुपये.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र.
महत्वाच्या तारखा –
- ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – १६ ऑक्टोबर २०२३
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ व्हेंबर २०२३
अधिकृत बेवसाईट – http://www.mahapwd.com/
