Thursday, January 15, 2026
Homeचालू घडामोडीभारत-युगांडा' थेट विमानसेवेचा शुभारंभ

भारत-युगांडा’ थेट विमानसेवेचा शुभारंभ

भारत-युगांडा ‘ थेट विमानसेवेचा शुभारंभ

मुंबई / भारत आणि युगांडा दरम्यान थेट हवाई संपर्कामुळे व्यवसाय, व्यापार, संस्कृती, पर्यटन, आरोग्य सेवांचा विस्तार होणार आहे. अशा पाऊलामुळेच दोन्ही देशांतील परस्पर संबंध दृढ होणार असून समृद्धी, शांतता व चांगल्या भविष्यासाठी सहकार्य मजबूत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. युगांडा प्रजासत्ताकच्या राष्ट्रीय दिन आणि मुंबई-एंटेबे थेट उड्डाणाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, मंत्री एडवर्ड वामला, प्रा जॉयस किकाफुंडा, मधुसूदन अग्रवालजी, विनोद सरोगीजी आणि अबुल हुसेन समीर सोमय्याजी, जुही चावला, जय मेहता आणि इतर मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना युगांडा प्रजासत्ताकच्या राष्ट्रीय दिना निमित्त शुभेच्छा दिल्या. ते पुढे म्हणाले की, युगांडा हा आफ्रिकेतील सर्वात सुंदर देशांपैकी एक आहे. भारत आणि युगांडाचे द्विपक्षीय संबंध अनेक दशकांपासून आहेत. 40 हजारांपेक्षा जास्त भारतीय आज युगांडात राहतात आणि ते युगांडाच्या विकासात योगदान देत आहेत. आज सुरु होणाऱ्या भारत ते युगांडा विमानसेवेमुळे दोन्ही राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेत निश्चितच भर पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments