पदवीधरांना राष्ट्रीय तपास संस्थेत नोकरीची सुवर्णसंधी! महिना ५६ हजारांहून अधिक पगार मिळणार
भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
राष्ट्रीय तपास संस्थेत विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत उप विधी अधिकारी, वरिष्ठ सरकारी वकील, सरकारी वकील, प्रधान माहिती अधिकारी पदांच्या एकूण १३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून उमेदवारांना आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत.भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
राष्ट्रीय तपास संस्था भरती – २०२३
पदाचे नाव – उप विधी अधिकारी, वरिष्ठ सरकारी वकील, सरकारी वकील, प्रधान माहिती अधिकारी , पद संख्या- १३
अर्ज पद्धती – ऑफलाईन , अर्ज सादर करण्याचा पत्ता – SP (Admi), NIA मुख्यालय, CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – ११०००३
