Wednesday, January 14, 2026
Homeचालू घडामोडीटोकियो येथील जागतिक कराटे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या चमूला मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

टोकियो येथील जागतिक कराटे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या चमूला मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

टोकियो येथील जागतिक कराटे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या चमूला मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

मुंबई / जागतिक कराटे चॅम्पियनशिपध्ये सहभागी होणाऱ्या टीमला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. ऑक्टोबर, २०२३ मध्ये जपानमधील टोकियो येथे होणाऱ्या जागतिक कराटे चॅम्पियनशिपमध्ये मुंबईच्या कराटेनोमिची वर्ल्ड फेडरेशन इंडिया संस्थेतील खेळाडू सहभागी होणार आहेत. या खेळाडूंनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. कराटे चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणाऱ्या संघातील या संस्थेचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्यासह ७ खेळाडू, २ पंच अधिकारी अशा ९ जणांच्या चमूला मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments