Wednesday, January 14, 2026
Homeचालू घडामोडीजिल्हा परिषद भरतीत अर्जांचा पाऊस; वाशीम जिल्ह्यातील २४२ पदांकरिता तब्बल ‘इतके’ अर्ज

जिल्हा परिषद भरतीत अर्जांचा पाऊस; वाशीम जिल्ह्यातील २४२ पदांकरिता तब्बल ‘इतके’ अर्ज

जिल्हा परिषद भरतीत अर्जांचा पाऊस; वाशीम जिल्ह्यातील २४२ पदांकरिता तब्बल ‘इतके’ अर्ज

बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषद अंतर्गत गट क संवर्गातील विविध १८ प्रकारातील २४२ पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.

वाशीम : बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषद अंतर्गत गट क संवर्गातील विविध १८ प्रकारातील २४२ पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. त्याकरीता १२ हजार ३५२ अर्ज प्राप्त झाले असून परिक्षा शुल्कातून अंदाजे १ कोटी १८ लाख रुपयाचा महसूल जमा झाला आहे. वाशीम जिल्हा परिषदेत विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामध्ये आरोग्य सेवक (पुरुष) आरोग्य सेविका ( महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ सहाय्यक, वरीष्ठ सहाय्यक, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, लघुलेखक उच्च श्रेणी, विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अशा विवधि २४२ पदाची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती.त्यानुसार आवश्यक त्या पदाकरीता शैक्षनिक पात्रतेनुसार ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार राखीव प्रवर्गातून नऊशे तर खुल्या प्रवर्गातून एक हजार रुपये परिक्षा शुल्क आकारण्यात आले होते. त्यानुसार २४२ पदाकरीता १२ हजार ३५२ अर्ज प्राप्त झाले असून परिक्षा शुल्कापोटी १ कोटी १८ लाख रुपयाचा महसुल जमा झाला आहे. दरम्यान, परीक्षेचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे परीक्षार्थी आता वेळापत्रकाच्या प्रतीक्षेत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments