Wednesday, January 14, 2026
Homeचालू घडामोडीसीमा देव यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील सुवर्णयुगाचा अंत -उपमुख्यमंत्री अजित पवार

सीमा देव यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील सुवर्णयुगाचा अंत -उपमुख्यमंत्री अजित पवार

सीमा देव यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील सुवर्णयुगाचा अंत -उपमुख्यमंत्री अजित पवार

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना उपमुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

मुंबई / “ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनाने मराठी, हिन्दी चित्रपटसृष्टीतील सुवर्णयुगाचा अंत झाला आहे. आपल्या सहज अभिनयाने चित्रपट रसिकांच्या हृदयावर तब्बल सहा दशके अधिराज्य गाजवणाऱ्या गुणी अभिनेत्रीला आज आपण मुकलो आहोत. अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या शोकसंदेशात उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणतात की, सीमा देव यांचे निधन देशभरातील चित्रपट रसिक, मराठी माणसासाठी धक्कादायक आहे घटना आहे. गतवर्षी रमेश देव यांचे निधन झाले. सीमा देव आणि रमेश देव ही जोडी रुपेरी पडदा आणि वास्तव जीवनातही पती-पत्नींची आदर्श जोडी होती. सीमा देव यांचे निधन मराठी चित्रपटसृष्टी व भारतील कलाक्षेत्रासाठी मोठी हानी आहे. सीमा देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थना करतो.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments