Thursday, January 15, 2026
Homeचालू घडामोडी१२ वी पास आणि पदवीधरांना MIDC मध्ये नोकरीची मोठी संधी! ‘या’ ८०२...

१२ वी पास आणि पदवीधरांना MIDC मध्ये नोकरीची मोठी संधी! ‘या’ ८०२ पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या सविस्तर

१२ वी पास आणि पदवीधरांना MIDC मध्ये नोकरीची मोठी संधी! ‘या’ ८०२ पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या सविस्तर

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आस्थापनेवरील गट अ, ब आणि क संवर्गातील ८०२ पदांसाठी जाहिरात आली आहे. अनेक वर्षांनी ही पदभरती होणार आहे.

नागपूर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आस्थापनेवरील गट अ, ब आणि क संवर्गातील ८०२ पदांसाठी जाहिरात आली आहे. अनेक वर्षांनी ही पदभरती होणार आहे.  या भरती मध्ये कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी), सहयोगी रचनाकार, उप रचनाकार, उप मुख्य लेखा अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अभियंता (विद्युत यांत्रिकी), सहाय्यक रचनाकार, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ, लेखा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत / यांत्रिकी), लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक, सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-२), वीजतंत्री (श्रेणी-२), पंपचालक (श्रेणी-२), जोडारी (श्रेणी-२), सहाय्यक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरिक्षक, भूमापक, सहायक अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, चालक यंत्र चालक, अग्निशमन विमोचक व वीजतंत्री श्रेणी २ अशी अनेक पदे आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments