मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं विविध पदांसाठी भरती जारी केली आहे. ज्यासाठी उमेदवार 1 ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकतात.
बई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MUMBAI METRO RAIL CORPORATION LTD.) द्वारे भरती अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार MMRCL मध्ये व्यवस्थापकीय आणि इतर पदांवर भरती केली जाणार आहे. ज्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार MMRCL mmrcl.com च्या अधिकृत साइटद्वारे अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेसाठी नोंदणी प्रक्रिया 21 जून रोजी सुरू झाली आहे. 1 ऑगस्ट 2023 ही नोंदणी प्रक्रियेची शेवटची तारीख आहे. या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील 22 पदे भरण्यात येणार आहेत.
