Wednesday, January 14, 2026
Homeचालू घडामोडीओळख शिक्षण धोरणाची

ओळख शिक्षण धोरणाची

गेल्या शुक्रवारी नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०२० मधील मुक्त आणि दूरस्थ शिक्षण पद्धती व ऑनलाइन पद्धतीने अध्ययन व अध्यापनासंदर्भात प्रा. रमेश सर माहिती देत होते. प्राध्यापक सुशील यांनी सराना विचारलं, ‘‘सर, आता या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत विचार करताना औपचारिक अध्ययन-अध्यापन पद्धतीबरोबरच अनौपचारिक पद्धतींनाही महत्त्व येणार तर. याविषयी आम्हाला अधिक काही सांगू शकाल का?’’ रमेश सर म्हणाले, ‘‘अर्थातच आपण त्याबद्दल आज बोलणार आहोत. आता आपण  2020  चं खास वैशिष्टय़ असलेल्या बहुविद्याशाखीय दुहेरी, संयुक्त आणि द्विपदवी कार्यक्रमांच्या रचनेला समजून घेऊ या, म्हणजे आपोआपच औपचारिक व अनौपचारिकतेची सांगड कशी घालता येईल ते कळू शकेल.’’ सर सांगू लागले, ‘‘बहुविद्याशाखीय दुहेरी, संयुक्त आणि द्विपदवी कार्यक्रमांतर्गत,हे औपचारिक आणि अनौपचारिक अशा दोन्ही पद्धतींचा समावेश असलेल्या शिक्षणाचे अनेक मार्ग सुलभ करण्याच्या गरजेवर भर देते. हे धोरण, विद्यार्थ्यांमधून विचारशील, उत्तम आणि सर्जनशील व्यक्ती घडवण्यासाठी विज्ञान, सामाजिक विज्ञान, कला, मानव्य विद्या, भाषा, तसेच व्यावसायिक, तांत्रिक आणि व्यावसायिक विषयांसह विविध विषयांची उपलब्धता निर्माण करण्यावर भर देते. एखाद्या व्यक्तीला एक किंवा अधिक विशेष क्षेत्रांमध्ये रुची असेल तर, त्या विषयांचा सखोल स्तरावर अभ्यास करण्यासाठी त्या व्यक्तीला सक्षम करण्याच्या गरजेवरही भर देते. उच्च शिक्षणाच्या मागणीत झपाटय़ाने होणारी वाढ आणि पारंपरिक अभ्यास शाखांमधील प्रवेशांच्या जागांच्या मर्यादित उपलब्धतेमुळे अनेक उच्च शिक्षण संस्थांनी  विद्यार्थ्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मुक्त आणि दूरस्थ शिक्षण मोडमध्ये विविध प्रकारचे शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. अशाप्रकारे, महाराष्ट्र राज्यामधील उच्च शिक्षण संस्थांमध्ये बहुविद्याशाखीय दुहेरी/ संयुक्त/ द्विपदवी कार्यक्रमाची औपचारिक आणि अनौपचारिक अशा दोन्ही पद्धतींमध्ये अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे.’’ रमेश सरांनी हा मुद्दा समजावून सांगताना आणखी काही मुद्दे मांडले.

प्रा. महेश यांनी विचारलं, ‘‘सर, बहुविद्याशाखीय दुहेरी पदवी अभ्यासक्रमांची निवड विद्यार्थ्यांना कशी करता येईल?’’ रमेश सर उत्तरले,  ने अलीकडेच सर्व  ला विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदवी मिळवता यावीत यासाठी योग्य ते बदल करण्यास सांगितले आहे आणि एकाच वेळी दोन शैक्षणिक कार्यक्रम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे घोषित केली आहेत:

विद्यार्थी दोन पूर्णवेळ शैक्षणिक अभ्यासक्रम हे प्रत्यक्ष वर्गात बसण्याच्या पद्धतीने म्हणजे फिजिकल मोडमध्ये पूर्ण करू शकतात. अर्थात, या दोन्ही अभ्यासक्रमांच्या वेळा एकमेकांपेक्षा वेगळय़ा असाव्यात याची काळजी घ्यावी. दोन्ही अभ्यासक्रमांच्या अध्यापनाच्या वेळांची एकमेकांत सरमिसळ होता कामा नये. विद्यार्थी दोन शैक्षणिक कार्यक्रम घेऊ शकतात: त्यापैकी एक प्रत्यक्ष वर्गात बसण्याच्या पद्धतीने म्हणजे फिजिकल मोडमध्ये असू शकेल आणि दुसरा मुक्त आणि दूरस्थ पद्धतीचा म्हणजे सर्वपरिचित अशा शब्दांत सांगायचं तर ओपन अँड डिस्टन्स लर्निग ऑनलाइन मोडमध्ये; किंवा ते एकाच वेळी दोन्ही अभ्यासक्रम  मुक्त आणि दूरस्थ पद्धतीचेही घेऊ शकतात.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments