Wednesday, January 14, 2026
Homeपरीक्षायूपीएससीची तयारी

यूपीएससीची तयारी

प्रस्तुत लेखामध्ये यूपीएससी मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर दोन मधील पंचायती राज व्यवस्था या घटकाची परीक्षाभिमुख तयारी कशी करावी याबाबत आपण चर्चा करणार आहोत. भारतात प्राचीन काळापासून ग्रामपंचायती ग्रामीण जीवनाचा एक भाग होत्या. भारतात वसाहतवादी राजवटीच्या काळात संसदीय शासन पद्धतीचा पाया घातला गेला. तथापि, संसदीय व्यवस्था केंद्रीकरणाकडे झुकलेली आहे, हे स्वातंत्र्य लढय़ातील धुरीणांना ज्ञात होते. त्यातूनच लोकशाही विकेंद्रीकरणाची चर्चा सुरू झाली. महात्मा गांधी यांनी विकेंद्रीकरणाचे प्रारूप म्हणून स्वावलंबी आणि स्वायत्त खेडे हाच केंद्रबिंदू मानला. स्वातंत्र्यानंतर भारतासमोर अनेक समस्या होत्या, त्यातून मार्ग काढण्यासाठी देशव्यापी विकास योजना आखण्यात आल्या. यामध्ये २ ऑक्टोबर १९५२ साली महात्मा गांधी जयंतीपासून समुदाय विकास कार्यक्रम लागू करण्यात आला. ग्रामीण समाजाचा सर्वागीण विकास घडवून आणणे हा समुदाय विकास कार्यक्रमाचा उद्देश होता. समुदाय विकास कार्यक्रम व त्याला पूरक अशी राष्ट्रीय विस्तार सेवा यांचे मूल्यमापन करण्यासाठी बळवंतराय मेहता समिती नियुक्त करण्यात आली. या समितीने सुचविलेल्या त्रिस्तरीय आराखडय़ातून पंचायती राज व्यवस्था निर्माण झाली. २०२२ च्या मुख्य परीक्षेमध्ये पंचायती राज व्यवस्थेच्या कारभारप्रक्रियेविषयी प्रश्न विचारला आहे. उदा. ‘तुमच्या मते, भारतातील सत्तेच्या विकेंद्रीकरणामुळे तळपातळीवरील कारभार प्रक्रियेची परिस्थिती कितपत बदलली आहे

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments