भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. यासाठी दक्षिण मध्य रेल्वेमध्ये ज्युनिअर टेक्निकल असोसिएटमध्ये पदावर भरतीसाठी अधिसुचना जाहीर केली आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवार ३० जून २०२३पर्यंत किंवा त्याच्या आधी ऑफलाईन अर्ज करू शकतात. त्यांना आपला अर्ज ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये जमा करावे लागेल.
या भरतीमध्ये प्रक्रियामध्ये एकूण ३५ पदांसाठी भरती होणार आहे. उमेदवार या पदांवर अर्ज भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट वरुन डाऊनलोड करु शकतात. जे उमेदवार या पदावर अर्ज करू इच्छित आहे त्यांनी खाली दिलेली सर्व माहिती दिलेली व्यवस्थित वाचावी.
