करोना महामारीपासून जगभरात नोकऱ्यांची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. अनेक बड्या कंपन्या बंद झाल्या तर काही कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला, त्यामुळे जगभरातील लोकांच्या नोकऱ्यांवर गदा आली. मात्र जगभरात असे अनेक लोक आहेत जे अनोख्या कल्पनांच्या मदतीने घरात बसून लखपती बनत आहेत. यात लॉकडाऊन संपल्यानंतर लोक पुन्हा कामाच्या शोधात लागले. यात काही कमी शिकलेले लोक कठीण काळात काही छोट्या नोकऱ्या करण्यास तयार झाले, या नोकऱ्यांमध्ये आता अशी एका नोकरीची भर पडली आहे, जिचा पगार आणि काम ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
पक्षी हाकलवण्याचे काम
युनायटेड किंगडमची मिस्टर चिप्स नावाची कंपनी एका विचित्र नोकरीसाठी लोकांची भरती करीत आहे. नोकरीत काय करावे लागते हे जाणून सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे. ही कंपनी पक्ष्यांना हाकलवण्यासाठी ही नोकरी देत आहे. ही नोकरी तुम्हालाही थोडी विचित्र वाटली असेल पण ती करण्यासाठी अनेक जण तयार झाले आहेत.
