Wednesday, January 14, 2026
HomeTeaching and Faculty Jobs३८१ जागांसाठी होणार शिक्षकांची मेगाभरती

३८१ जागांसाठी होणार शिक्षकांची मेगाभरती

महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाअंतर्गत मेगाभरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या भरतीद्वारे शिक्षक या पदाच्या रिक्त जागांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरावे लागणार आहेत. अर्ज करण्याच्या प्रक्रियेला ६ जून २०२३ रोजी सुरुवात झाली आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रातील पदवी असणे आवश्यक आहे. कामाचा अनुभव आणि विशेष गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या या मेगाभरतीद्वारे निवड झाल्यास उमेदवारांना महाराष्ट्रामध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. शिक्षकांच्या एकूण २३८१ जागांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जून ही आहे. अर्ज करणाऱ्या व्यक्तीची कमाल वयोमर्यादा ५० वर्ष आहे.

शैक्षणिक पात्रता व अन्य सविस्तर माहितीसाठी उमेदवार  या वेबसाइटची मदत घेऊ शकतात. ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांना ठराविक रक्कम प्रवेश शुल्क म्हणून भरावी लागेल. सर्व संवर्गातील उमेदवार ९५० रुपये, तर दिव्यांग उमेदवारांना ८५० रुपये अर्जासह भरावे लागणार आहेत. भरतीसाठी अर्ज केल्यानंतर उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल. त्यातून पुढे निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निकाल जाहीर केला जाईल.

किती आहे पगार?

शिक्षक या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार दिला जाईल. त्याचे वेतनमान ४१,८०० ते १,३२,३०० रुपये इतके असणार आहे. शासनाने या भरतीसंबंधित प्रसिद्ध केलेल्या सूचनापत्रकामध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे.  या अधिकृत वेबसाइटवरुन भरतीसंबंधित अपडेट्स मिळवू शकता.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments