आयबीएसद्वारे पीओ क्लार्क भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवार आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाईट भेट देऊन ०१ जून ते २१ जून २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता. याआधी बुधवारी, ३१ मे रोजी २०२३-२४ वर्षासाठी आयबीएस क्लार्क पीओ परिक्षेची अधिसुचना बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली होती.
या भरती प्रक्रियेंतर्गत देशभरातील असलेल्या ग्रामीण बँकेच्या ऑफिस असिस्टंट (लिपिक), ऑफिसर स्केल-I/पीओ ( असिस्टंच मॅनजेर) आणि ऑफिसर स्केल २ (मॅनेजर) आणि ऑफिस स्केल ३ (सिनियर मॅनेजर) पदासाठी साधारण ८६१२ पदांसाठी भरती केली जाणार आहे. सीआपी आरआरबी १२वी परिक्षा सामान्य भरती प्रक्रियेच्या माध्यमातून आयोजित केली जाईल.
