पुणे /महानगरपालिकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजेपयी वैद्यकीय महाविद्यालयातील उर्वरित पदे भरण्याच्या प्रस्तावास महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता महाविद्यालयातील १०१ पदांची भरती प्रक्रिया राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या भरतीअंतर्गत विविध विभागाचे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक अशा २४ जागा, सहाय्यक प्राध्यापकांच्या २६ जागांसह प्रशासकीय अधिकारी, ग्रंथपाल व अन्य शिक्षकेतर कर्मचारी अशा एकूण १०१ जागी भरण्यात येणार आहेत.
पुणे महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी
RELATED ARTICLES
