बृहन्मुंबई /महानगरपालिका अंतर्गत मेगाभरतीचे आयोजन केले जामार आहे. बीएमसीमध्ये नोकरी मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याच्या प्रक्रियेला २७ मे रोजी सुरुवात झाली आहे. भरतीसाठी शैक्षणिक पात्रता महत्त्वपूर्ण ठरणार आहे. संबंधित क्षेत्रातील अनुभव आणि विशेष गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. बीएमसीच्या अधिकृत वेबसाइटवर भरतीशी संबंधिक सविस्तर माहिती मिळवू शकता. तसेच अपडेट्स मिळवण्याकरिता व्हॉट्सॲप ग्रुपची मदत घेऊ शकता. बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सहाय्यक कार्यकारी पदाच्या एकूण ११७८ जागांसाठी भरती केली जाणार आहे. २७ मे ते १६ जून या कालावधीमध्ये इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करु शकणार आहेत. थोडक्यात १६ मे ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना वयाचे कमाल वयाचे बंधन नाही असे म्हटले जात आहे. अर्ज केल्यानंतर ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल. त्यातून पुढे योग्य उमेदवाराची निवड केली जाईल. बीएमसीमध्ये सहाय्यक कार्यकारी म्हणून काम करणाऱ्या उमेदवारांना २१,७०० ते ६९,१०० रुपये वेतन मिळणार आहे.
जागांसाठी मेगाभरती
RELATED ARTICLES
