भारतीय तिब्बत सीमा पोलीस दलाने काही दिवसांपूर्वी मेडिकल ऑफिसरच्या बंपर पदांसाठी भरती काढली होती. गेल्या काही दिवसांपासून या नोकर भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या विभागात नोकरी करण्याची इच्छा असूनही अर्ज केला नसेल तर आताच अप्लाय करा, कारण अर्ज भरण्याची शेवटची तारीख १६ मार्च २०२३ आहे. ज्या उमेदवारांना आयटीबीपीमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून नियुक्त व्हायचं आहे, असे उमेदवार अर्ज करु शकतात.
अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
१) या नोकर भरतीच्या माध्यमातून सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर, स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर आणि मेडिकल ऑफिसर पदे भरण्यात येतील.
२) अर्ज भरण्याची प्रक्रिया १५ फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे. अप्लाय करण्याची अंतिम तारीख १६ मार्च २०२३ आहे.
३) या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करु शकता. यासाठी तुम्हाला इंडो-तिब्बतन बॉर्डर पोलीस फोर्सच्या ऑफिशियल वेबसाईटवर itbpolice.nic.in जावं लागेल.
४) अन्य कोणत्याही माध्यमाद्वारे केलेला अर्ज स्विकारला जाणार नाही.
५) या नोकर भरतीच्या माध्यमातून एकूण २९७ पद भरण्यात येतील.
