राज्यातील सरकारी कर्मचारी यांनी जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी संपाची हाक दिली असून, शिक्षक देखील या संपात सहभागी झाले आहेत.लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील शासकीय कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे.संपाला आठवडा उलटत आला तरीही याबाबत तोडगा निघालेला नाही. दुसरीकडे जुनी पेन्शनच्या मागणीसाठी शासकीय कर्मचारी सातव्या दिवशीही संपावर कायम आहे.मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील भग्गाव येथील गावकरी पुढे आले आहेत. आपल्या मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी गावकऱ्यांनीच शाळा भरवली आहे. शिक्षक शाळेत आल्यावर संपामुळे वर्ग भरवत नाही. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी भग्गाव येथील गावकऱ्यांनी एकत्र येऊन, स्वतः शाळा भरवण्याचा निर्णय घेतला आहे मुलांना शिकवण्यासाठी गावातील उच्चशिक्षित तरुण पुढे आले आहेत. या उच्चशिक्षित तरुणांनी शाळेत येऊन वर्ग घ्यायला सुरुवात केली आहे. संपामुळे शिक्षक शाळेत येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून गावकऱ्यांनी एकत्र येत हा निर्णय घेतला आहे. त्यात परीक्षा तोंडावर असल्याने शाळा बंद असल्यास याचा परिणाम मुलांच्या अभ्यासावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षकांचे संप संपेपर्यंत गावकरी शाळा भरवणार आहे.
शिक्षक संपावर गेल्याने गावकऱ्यांनीच भरवली शाळा
RELATED ARTICLES
