अग्निवीरांना शारीरिक क्षमता चाचणीसह वयाच्या बंधनावर सूट मिळणार आहे. त्यांच्या पहिल्या बॅचसाठी पाच वर्षं आणि त्यापुढील बॅचसाठी लेव्हल-१, लेव्हल-२ आणि त्यांच्यावर असणाऱ्या पदांसाठी विविध गटांसाठी निश्चित केलेल्या वयाच्या अटींवर सूट दिली जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रेल्वे बोर्डाने सर्व महाव्यवस्थापकांना अधिकृत पत्र पाठवून रेल्वेमध्ये भरती करणाऱ्या संस्थांना वेतन लेव्हल-१ आणि वेतन लेव्हल-२ यांसाठी भरतीमध्ये ठराविक उमेदवारांना (अग्निवीरांना) सवलती देण्यास सांगितले आहे. याअंतर्गत भारतीय सैन्यात चार वर्षांपेक्षा जास्त काळ काम केले आहे, अशा अग्निवीरांना अराजपत्रित पदावर सवलती/ सुविधा मिळणार आहे. केंद्राने मागच्या वर्षी सुरू केलेल्या अग्निपथ भरती योजनेंतर्गत चार वर्षं पूर्ण झाल्यानंतर २५ टक्के भरती केली जाणार आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक, ट्रान्सजेंडर आणि अपंग व्यक्ती यांसारख्या असलेल्या गटातील उमेदवारांना वर्टिकल श्रेणींच्या माध्यमातून समान संधी दिली जाणार आहे.
रेल्वे विभाग भरतीमध्ये देणार आरक्षण
RELATED ARTICLES
