केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १२ वीचा निकाल जाहीर केला आहे. बोर्डाने अधिकृत वेबसाइट वर कोणतीही पूर्वसूचना न देता निकाल जाहीर केला आहे. परीक्षेला बसलेले विद्यार्थी पोर्टलवर निकाल पाहू शकतात. यंदा सीबीएसईच्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेत ८७.३३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ५ टक्क्यांनी कमी आहे. यंदा सीबीएसईच्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेत त्रिवेंद्रम झोनने ९९.९१ टक्क्यांसह सर्वोत्तम कामगिरी केली आहे. यानंतर बंगळुरू ९८.६४ टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. यंदा मुलींचा निकाल मुलांपेक्षा चांगला लागला आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ६ टक्के चांगला आहे, यंदा मुलांचा निकाल ८४.६८ टक्के तर मुलींचा निकाल ९०.६८ टक्के लागला आहे. या वर्षी एकूण १६,६०,५११ विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते. यांपैकी १४,५०,१७४ विद्यार्थी उर्तीण झाले आहेत.
१२ वीचा निकाल जाहीर
RELATED ARTICLES
