जबाबदारीची जाणीव ठेवून अनेक शिक्षक आपापल्या परिसरामध्ये सेवाकार्य करीत असतात. अशा शिक्षकांचा सर्वांनी आदर्श घ्यावा व नव्या उमेदीने काम करावे नव्या शैक्षणिक धोरणात काळानुसार बदल करण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षकांनी काळानुसार सकारात्मक बदल करण्याची आवश्यकता आहे, असे मत विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. वैशाली जामदार यांनी व्यक्त केले.