आरोग्य विभात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत (National Health Mission) नागपूरच्या आरोग्य विभात विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी बारावी ते एमबीबीएमस पर्यंतचे शिक्षण पूर्ण असलेले उमेदवार अर्ज करु शकतात. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन (NHM Recruitment) प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
नागपूर आरोग्य विभागाअंतर्गत वैद्यकीय अधिकारी (Medical Officer), स्टाफ नर्स (Staff Nurse) आणि मल्टी पर्पज वर्कल (Multi Purpose Worker, MPW) या पदांच्या एकूण १५९ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
मेडिकल ऑफिसर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून एमबीबीएसपर्यंतचे शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराला मेडिकल ऑफिसर पदाचा किमान अनुभव असणे गरजेचे आहे. नागपूर आरोग्य विभागाअंतर्गत देण्यात आलेल्या पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थींचे पालन करणे अपेक्षित आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ६० हजार रुपये पगार दिला जाणार आहे.
स्टाफ नर्स या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून जीएनएम/ बीएससी नर्सिंगचे शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराला स्टाफ नर्स पदाचा किमान अनुभव असणे गरजेचे आहे. नागपूर आरोग्य विभागाअंतर्गत देण्यात आलेल्या पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थींचे पालन करणे अपेक्षित आहे.या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २० हजार रुपये पगार दिला जाणार आहे.
जिल्ह्याच्या आरोग्य विभागात मोठी भरती अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
RELATED ARTICLES
