Wednesday, January 14, 2026
Homeचालू घडामोडीसर्वोच्च न्यायालयात पदवीधरांसाठी नोकरी टायपिंग येत असेल तर आजच करा अर्ज

सर्वोच्च न्यायालयात पदवीधरांसाठी नोकरी टायपिंग येत असेल तर आजच करा अर्ज

शोधात असलेल्या पदवीधर उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. सर्वोच्च न्यायालयात विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ज्युनिअर कोर्ट असिस्टंट (Junior Court Assistant Job) पदाच्या २१० रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविले आहेत. ज्युनिअर कोर्ट असिस्टंट भरती २०२२ साठी सर्वोच्च न्यायालयाची अधिकृत वेबसाइट sci.gov.in वर जाऊन अर्ज करता येणार आहे. ज्युनिअर कोर्ट असिस्टंट पदासाठी लेखी चाचणी, टायपिंग चाचणी, वर्णनात्मक चाचणी आणि मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. लेखी परीक्षेत वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील. तसेच कॉम्प्युटरवर इंग्रजी टायपिंगची परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षा आणि टायपिंग परीक्षा एकाच दिवशी होणार आहे.
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून ग्रॅज्युएशन पूर्ण असणे गरजेचे आहे. तसेच कॉम्प्युटरवर इंग्रजी टायपिंगचा वेग किमान ३५ शब्द प्रति मिनिट इतका असावा. उमेदवाराला कॉम्प्युटरचे किमान ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय १८ वर्षे ते ३० वर्षादरम्यान असावे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments