CRPF च्या १ लाखांहून अधिक जागांसाठीची मोठी भरती जाहीर
सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या उमेदवारांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी आहे. ती म्हणजे केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये, कॉन्स्टेबल (GD) पदांसाठीच्या तब्बल १ लाखांहून अधिक रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. याबाबतची अधिसूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केली आहे. त्यानुसार CRPF मध्ये जवळपास १ लाख ३० हजार कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदे भरली जाणार आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलात थेट भरतीद्वारे लेव्हल ३ ची पदे भरली जाणार आहेत.मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार, सीआरपीएफमध्ये GD कॉन्स्टेबलच्या एकूण १ लाख २९ हजार ९२९ पदांची भरती केली जाईल ज्यापैकी १ लाख २५ हजार २६२ पदे पुरुष उमेदवारांसाठी आहेत आणि ४ हजार ४६७ पदे महिला उमेदवारांसाठी असणार आहेत. तर कॉन्स्टेबल पदाच्या भरतीमधील १० टक्के रिक्त जागा या माजी अग्निवीरांसाठी राखीव असणार आहेत. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार याबाबतची अधिक माहिती जाणून घेऊया.
