Wednesday, January 14, 2026
Homeचालू घडामोडीघोडा मैदान लांब नाही, पृथ्वीराज चव्हाणांनी खासदार होऊन दाखवावं, गिरीश महाजनांचं खुलं...

घोडा मैदान लांब नाही, पृथ्वीराज चव्हाणांनी खासदार होऊन दाखवावं, गिरीश महाजनांचं खुलं आव्हान

 

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण  यांनी  एखाद्या ठिकाणाहून निवडून येऊन खासदार होऊन दाखवावे, असं आव्हान राज्याचे ग्रामविकास आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी दिलं. ते जळगावात  बोलत होते. “घोडा मैदान आता जवळ आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. वर्षभरात लोकसभेच्याही निवडणूक आहेत, लोकसभेच्या निवडणुकीला  तुम्ही उभे राहा आणि एकदा अनुभव घ्या, महाविकास आघाडीचा  एवढा जर जोर असेल, तर पृथ्वीराजबाबांनी एखाद्या ठिकाणहून खासदार होऊन निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. दरम्यान, यावेळी गिरीश महाजन यांनी शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv खासदार संजय राऊत  यांच्यावरही हल्लाबोल केला. “महाराष्ट्रातील जनता संजय राऊत यांच्याकडे करमणूक आणि जोकर म्हणून बघत असते,” असं गिरीश महाजन म्हणाले. गिरीश महाजन म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचारांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत असं संजय राऊत म्हणत आहेत. मात्र त्यांचा बोलाण्याला काहीही अर्थ राहिलेला नाही. कुठलीही सीमा राहिलेली नाही. दररोज सकाळी उठायचं आणि काही बडबड करत राहायचं. स्वतः काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेले आहात, तुमचे किती मंत्री आत जाऊन आलेले आहेत आणि किती अजून आत जाण्याच्या मार्गावर आहेत.आपण बोलताना जरा विचार करुन बोलत जा एवढा सल्ला मी देईन. परंतु त्यांचा आणि विचारांचा काही संबंध नाही, तोंडाला येईल तसे बोलत राहतात, काहीही बरळत राहतात,महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास त्यांच्यावर राहिलेला नाही. लोक एक करमणूक म्हणून आणि जोकर म्हणून त्यांच्याकडे बघत असतात,” अशी खोचक टीकाही गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर केली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments