करपरा नदी पात्रात झाडांची कत्तल करून भूमाफियांचा कब्जा निष्क्रिय प्रशासन मूग गिळून गप्प का? आम आदमी पार्टी आंदोलन करणार
माजी सैनिक अशोक येडे, जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी. ____________________________ *करपरा नदी पात्र भ्रष्ट अधिकारी नेते भूमाफिया यांच्या संगत मताने नदीचे रूपांतर नाल्यात झाले*. ____________________________ बीड बीड शहराच्या पूर्वेला ऐतिहासिक असणारी कपरा नदी ही दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहत जाणारी नदी आहे आज या नदीच्या अस्तित्वावरतीच भ्रष्ट अधिकारी भ्रष्ट नेते निकृष्ट प्रशासन भूमाफियांच्या घशामध्ये घालण्याचे काम करत आहे याच नदीपात्रामध्ये भूमाफिया मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करून त्याची वेली वाट लावून जाळून राख रांगोळी करण्याचं काम करत आहे तरीही प्रशासन कसल्याही प्रकारची यावरती भूमिका घेताना दिसत नाही या भागामध्ये आज आम आदमी पार्टीच्या निदर्शनास आले की भक्ती कंट्रक्शन च्या पाठीमागे पिप्परघवन रोड या ठिकाणी संपूर्ण भागातील रॉ मटेरियल आणून नदीपात्रात टाकण्यात येत आहे त्या नदीपात्रामध्ये असणारे मोठी जुनी झाडे त्याची कत्तल करून भूमाफिया तेथेच जाळण्याचे काम करत आहे तरी देखील या झाडांची कत्तल व याचा धूर देखील प्रशासनाच्या नाकात जायला तयार नाही यामध्ये नगर प्रशासन भूसंपादन पाटबंधारे विभाग हे सर्व संशयास्पद भूमिकेत आहेत यात काहीच शंका नाही या वृक्षांची कत्तल करणाऱ्या नदीवर ती कब्जा करणाऱ्या भूमाफ्यावरती कारवाई नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी सर्व जनतेला सोबत घेऊन वृक्षप्रेमी नदीप्रेमी समाजसेवक या सर्व संघटनांना सोबत घेऊन एक मोठे जन आंदोलन उभा करेन याची सर्व जबाबदारी ही प्रशासनाची असेल आम आदमी पार्टी अशा विषयांवर वारंवार प्रश्न उचलत आहे प्रशासनाने बिंदुसरा नदी वरती ज्या प्रकारे स्वच्छता अतिक्रमण हटवण्याची भूमिका राबवण्यात येत आहे त्याचप्रमाणे करपा नदी वरती देखील लक्षवेध हवे यासाठी जिल्हाधिकारी साहेबांना लवकरच आम आदमी पार्टीचे प्रतिनिधी मंडळ भेटणार आहे निदर्शना येते वेळेस यावेळी माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी सचिव रामधन जी जमाले शहर अध्यक्ष सय्यद सादेक तालुका उपाध्यक्ष आजम खान शहर सचिव मिलिंद पाळणे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
