१० वी पास उमेदवारांसाठी भारतीय रेल्वेत नोकरीची संधी!
३०००पेक्षा जास्त पदांसाठी होणार भरती
रेल्वेमध्ये परिक्षा न देता नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी आहे. ही भरती उत्तर रेल्वेमध्ये निघाली आहे. उत्तर रेल्वेने अप्रेंटिसशिप पदांच्या भरतीसाठी अर्ज मागावले आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ३०९३ पदांसाठी अर्ज निघणार आहे. जर तुम्हीदेखील या पदांसाठी अर्ज करू इच्छित आहात तर आजच अर्ज भरा. अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे अधिकृत सुचनेनुसार अर्जाची प्रक्रिया ११ डिसेंबरपासून सुरु झाली आहे. तर अर्ज करण्यासाठी ११ जानेवारीपर्यंतची मुदत आहे.
१०वी पास आणि आयटीआय उतीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी
१०वी पास उमेदवार रेल्वे अप्रेंटिस भरतीसाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी एसएससी/ मॅट्रिक/ १०वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) किमान ५० टक्के गुणांसह मान्यता प्राप्त मंडळातून उत्तीर्ण केलेले असावे आणिभारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त NCVT/SCVT द्वारे जारी केलेला संबंधित शाखेमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय किमान १५ वर्षे आणि कमाल २४ वर्षे असावे. विविध प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेतही सवलत दिली जाईल
