मुंबई/ उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अकरावी प्रवेशासाठी सीईटी रद्द करण्यात आली. दहावीच्या गुणांवरच प्रवेश प्रक्रिया राबवण्याचे आदेश गुरुवारी सरकारने काढले. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत लवकरच विस्तृत आदेश काढण्यात येतील. अकरावीच्या प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना नोंदणी प्रक्रियेतील भाग एकमधील माहिती भरावी लागणार आहे. त्यानंतर अकरावी प्रवेशांची केंद्रीय प्रवेश पद्धती सुरू केली जाणार आहे. पुढील आठवड्यात प्रवेशांबाबत शासन आदेश जाहीर होण्याची शक्यता आहे.
अकरावीचे प्रवेश होणार सुरू
RELATED ARTICLES
